अमेरिकन काँग्रेसने पाकिस्तानला 4.5 हजार कोटी रुपयांच्या (70 कोटी डॉलर) मदतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. अमेरिकेकडून अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या अभियानाला समर्थन देण्याच्या बदल्यात पाकिस्तानला ही रक्कम दिली जाणार आहे. अमेरिका आघाडी सहायता निधीकडून (सीएसएफ) ही रक्कम पाकिस्तानला देण्यात येणार आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. हा अधिकार 2018 च्या राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकरण अधिनियम (एनडीएए-2018) च्या सभागृह आणि सिनेटच्या नियमावलीत समावेश करण्यात आला होता. याच आठवडय़ाच्या प्रारंभीच तो जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानने हक्कानी नेटवर्क आणि लष्कर ए तोयबाविरोधात पाऊल उचलल्याचे अमेरिकेचे संरक्षण सचिव जिम मॅटिस यांनी प्रमाणित केल्यानंतर त्यांना 35 ते 70 कोटी डॉलपर्यंत मदत केली जाईल, असे यात म्हटले आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews